गेटचा रिजल्ट आला आणि पीजी करायचा विचार मनात नक्की केला, स्कोर तसा बरा होता कदाचित आय आय टी ला एडमीशन मिळाली असती पण मी फारसा त्रास न घेता पुण्याला पीजी करण्याचं नक्की केलं.
हितेशपण बरोबर आहे हे कळल्यावर बरं वाटलं, खरंतर हीतेश माझ्या बरोबर डिप्लोमाला होता, पण ग्रुप्स वेगवेगळे असल्याने ओळख वरवरचीच होती. तरीसुद्धा पुण्याला जाण्यापुर्वी आपण एका माणसाला ओळखतो ही भावना दिलासा देणारी होती.
ऐन अड़मिशनच्या दिवशीच कॉलेजला लेट पोह्चन्याचा शहाणपणा आम्ही केला, पण हीतेशने फ़ोन करुन कॉलेजला पूर्वसूचना दिल्याने थोडक्यात बचावलो, नाहीतर सगळीच बोंब होती...........नोकरीही सोडलेली आणि अड़मिशन ही नही अशी अवस्था झाली असती ..................म्हणजे करायला गेलो काय आणि उलटे झाले पाय ...........पण तसे काहीही न होता झालं एकदाचं अड़मिशन. सरळ मार्गी माणसाला जेवढी सरप्राइझेज कमी तेवढी चांगली
काँलेज सुरु व्यायला अजुन बराच अवकाश होता म्हणुन घरी यायला निघालो तोच पाठीमागुन हाक;
"हाय''
मागे बघितलं तर ४० -४५ किलो वजनी गटातला, सड्पातळ बांध्याचा मुलगा हसत उभा होता.
"मी दिपक", त्याने परिचय दिला.
"काय अड़मिशन काय ?", दिपक साहेबांचा दुसरा प्रश्न.
"नाही मासे पकडायला आलोय, येतोस? मी मनात म्हणालो", काही गोष्टी पहिल्याच भेटीत बोलता येत नाहीत याची खंन्त वाटली.
"हो"
"कोणती ब्रांच ?"
"मेकेनिकल, थर्मल " मी म्हणालो.
तेवढ्यात पाठीमागुन हीतेश आला, परत ओळखीचा कार्यक्रम झाला.
"आता काय प्लान आहे?" दिपकने आम्हाला विचारलं.
"काही विशेष नाही, जेवायला जातोय, नंतर परत मुंबईला जाणार".
"आचरटागत भूक लागली आहे, मी ही येतो तुमच्या बरोबर"
हा कोणता भुकेचा प्रकार असा विचार करतच आम्ही जवाळच एका हाँटेलात शिरलो.
"मग रहायची सोय झाली का?'' दिपकने जेवताना मधुनच विचारलं
"नाही अजून, नंतर शोधू, अजून कॉलेज सूरू व्हायला वेळ आहे" हीतेश म्हणाला
"मला पण जागा शोधायची आहे, एकत्र राहू" दिपकने प्रस्ताव मांडला
"ठिक आहे..." मी म्हणालो, माझा हाच होकार पूढे चर्चेचा विषय होईल याची मला त्या क्षणी अजिबात कल्पना नव्हती। बोलता बोलताच दिपक बेल्गाव्चा आहे असं कळालं.
जेवण झाल्यावर एकमेकांचं अभिनंदन करुन (अड़मिशन मिळाल्याने) आणि एकमेकांचे फ़ोन नंबर घेउन आम्ही मूम्बईला परत यायला निघालो..........
क्रमशः............
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Ultimate.........
उत्तर द्याहटवाi enjoyed..tu pharach changla lihtos.
उत्तर द्याहटवाi hope u will continue to write..and that too regularly
Lekhani Uchalli aani Lekhak janmala ...!
उत्तर द्याहटवा( yekdum PL, vapu yanchya laynit gelas reee ..)
changla lihiles .. mast..
pan kay aahe..
eethe yek correction suchavave asa vattay..
" mala pan jaga shodhaychi aahe" aani "yekatra rahu" yamadhe ""MI MHANALO "" ....
HE TEVDHE TAKAYCHE VISARLAS ..!
माझा हाच होकार पूढे चर्चेचा विषय होईल याची मला त्या क्षणी अजिबात कल्पना नव्हती.
उत्तर द्याहटवा.... Sahi hai bhidu
आचरटागत. Ha shabd kalala tar bara hoil.
सरळ मार्गी माणसाला जेवढी सरप्राइझेज कमी तेवढी चांगली
उत्तर द्याहटवा- Hi jara atishayokti aahye ;)
काही गोष्टी पहिल्याच भेटीत बोलता येत नाहीत याची खंन्त वाटली.
उत्तर द्याहटवासरळ मार्गी(ho ho ..pan Ha kon?) माणसाला जेवढी सरप्राइझेज कमी तेवढी चांगली
माझा हाच होकार पूढे चर्चेचा विषय होईल याची मला त्या क्षणी अजिबात कल्पना नव्हती।
It reflects ur sense of humor in writing also.
If u dont know i would like to tell u,ha lekh mhanaje lalit gadyacha uttam namuna ahe,In these type of writing reader wont go for next page ,jar likhanat mishkilpana nasel.But u have sicceeded in that as i was searching for next botton .hopefully the consitancy will be maitained.
If u increase ur reading(as u do)u will be good writer& if write regularly giving special time for it.waiting for next page.....
Dhawal you were always unique in our class infact I feel you r a original piece which can't be found somewhere else. So your concept of blog was unique and I liked the way you wrote. I am waiting for my description in your blog.
उत्तर द्याहटवाThrough your blog I want to convey our dear Professor Adhik to atleast avoid simplest spelling mistakes.